Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासदारकी गेल्यानंतर आता शासकीय निवास्थान सोडण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
दरम्यान, लोकसभेच्या हाऊस कमिटीकडून त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे. २२ एप्रिलपर्यंत शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश राहुल गांधींना देण्यात आले आहेत. आता राहुल गांधी दिल्लीत राहणार की बाहेर हे लवकरच समजेल. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला स्वतःचे घर नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता काँग्रेस पुढे काय भूमिका घेतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान देशात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंदोलन केले जात आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. अनेक विरोधी पक्षांनी देखील याचा निषेध केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.