राजकारण

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जागी वायनाडमधून ‘ही’ व्यक्ती लढवणार निवडणूक? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याचा तयारीत..

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. यामुळे देशात वातावरण तापले आहे. आता राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सध्या सध्या कायदेशीर लढाई काँग्रेसची कायदेशीर टीम पाहणार असल्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. केवळ उच्च न्यायालयात दोषी ठरविणे, सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करणे आणि सर्वोच्च न्यायालयात सदस्यत्व रद्द करणे या मुद्दय़ांवर ही टीम काम करत आहे. यामुळे याकडे काँग्रेस नेत्यांचे लक्ष आहे.

सध्या सोनिया गांधी देखील पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु असली तरी न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील निर्णय़ घेतला जाणार आहे. काँग्रेस नेते सध्या राज्यभरात आंदोलन करत आहेत.

प्रियांका गांधी देखील ट्विटवरून निशाणा साधत आहेत. राहुल गांधींना सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून पक्ष हालचालींपासून दूर असल्याचे दिसून आले. राहुल गांधींची रणनीती, अदानींवर फोकस आणि सदस्यत्व रद्द केल्यामुळे हे प्रकरण कायदेशीर गुंतागुंत वाढली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. यामुळे विरोधी पक्ष देखील एकत्र येत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अजूनच वातावरण तापणार असून मोदींविरोधात रोष वाढत चालला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts