Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, असे ते म्हणाले.
काल काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली. यामुळे यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राजू शेट्टी यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, सध्या राजकारणामध्ये कशा पद्धतीचा भाषेचा वापर करावा, कशी टीका टिप्पणी करावी, याचे कसलेही ताळतंत्र राहिलेले नाही.
असंसदीय शब्द कसेही सर्रासपणे वापरले जातात, अशी स्थिती असली तरी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयाने ज्या तात्काळतेने शिक्षा सुनावली, ते संशयास्पद वाटत आहे. लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व अशाप्रकारे रद्द करणे, हे योग्य नाही, ते चुकीचेच आहे, असे माझे मत आहे, असे शेट्टी म्हणाले.
तसेच राजकारण करण बाजूला ठेवा. या प्रकाराकडे पाहिल्यावर लोकशाहीवर एक प्रेम करणारा माणूस म्हणून आपल्याला खेद वाटतं. तुम्ही आज सत्तेत म्हणून केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहात, पण आगामी काळात त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल.
त्यावेळी त्यांचे काय होईल , याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा शेट्टींनी दिली. सध्या देशात राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर अनेक पक्ष नाराज झाले असून आवाज उठवत आहेत. काँग्रेस देखील आंदोलन करत आहे.