राजकारण

Ram Shinde : कर्जत- जामखेडमध्ये लवकरच दे धक्का, राम शिंदे करणार राजकीय भूकंप..

Ram Shinde : सध्या भाजप नेते राम शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे ते कर्जत जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची एकच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राम शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

कर्जतमध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यामुळे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

रोहित पवार याठिकाणी सध्या आमदार आहेत. त्यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. असे असताना आता कर्जत- जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट राम शिंदे यांनी केले आहे. यामुळे जामखेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

या ट्विटमध्ये राम शिंदे म्हणाले, कर्जत -जामखेड जि. नगरमधील इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश, असे ट्विट केले आहे.

यामुळे आता येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत याचा काय परिणाम होणार हे देखील लवकरच समजेल. जर असं झालं तर आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts