Ramdas Kadam : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर मधून मला तिकीट दिले. पण मी दापोलीतून मागितले होते. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला सांगून पाडले.
कशासाठी तुम्हाला त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण राज्याचा विरोधीपक्ष नेता हा राज्याचा पुढचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असतो. कदाचीत बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केले असते. असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
तसेच मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून तुम्ही मला पाडले. मला जाधव काय निवडणुकीत पाडतो. असे शंभर भास्कर जाधव मी खिशात घेऊन फिरतो, असेही रामदास कदम यावेळी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. एवढंच उद्धव ठाकरे हे खरं बोलत आहेत. अन्यथा ते सर्व खोट बोलत आहेत.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल, त्या दिवशी शिवसेना बंद करेल. मग आता उद्धव ठाकरे यांनी वडीलांचा आपमान केला. उद्धव ठाकरे यावर का बोलत नाहीत, असेही कदम म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उठतात कधी, झोपतात कधी हे देखील कळत नाही.
ते रात्रंदिवस काम करतात. माशाच्या पिल्लाला पोहायला शिकावं लागत नाही. हे योगेश कदम यांनी दाखवून दिले आहे. असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.