राजकारण

Ravindra Dhangekar : आमदार झाल्यानंतर धंगेकर करणार पत्नीची इच्छा पूर्ण, काय आहे नेमकी इच्छा..

Ravindra Dhangekar : पुण्यातील कसब्याच्या पोटनिवणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. धंगेकरांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचेही स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांचे स्वप्न काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमदार धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा त्या म्हणाल्या, पतीचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तेच माझ्यासाठी मोठे गिफ्ट आहे. ते आमदार झाल्यानंतरचा गुढीपाडवा आमच्यासाठी खास आहे. समाजातील त्यांचे काम पाहून माझ्यासह कुटुबातील सर्वांनी त्यांना पाठींबा दिला.

तसेच माझी अनेक दिवसांची जम्मू-काश्मिरला जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आमदार धंगेकर म्हणाले, कामाच्या व्यापात वैयक्तीक अनेक छोट्या मोठ्या गोष्टींना बगल द्यावी लागली. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मदत केली.

आता त्यांची इच्छा पूर्ण करणे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. तसेच माझीही काश्मिरला जाण्याची इच्छा आहे,असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी विधानभवनातील अनुभव सांगितले. ते म्हणाले, लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणुकीत विजय मिळाला आहे.

त्यामुळे आजचा गुढीपाडवा आमच्यासाठी खास आहे. विधानभवनात प्रथम मतदारांचे आभार मानले. त्यानंतर पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला. तेथे सर्व पक्षाचे मोठे नेते भेटतात. विरोधी पक्षातीलही आमदार भेटले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts