राजकारण

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत, कसब्यात मतदान करतानाचा फोटो केला शेअर

Rupali Patil : आज पुण्यात कसबा आणि चिंचवड साठी मतदान होत आहे. याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कसब्यात मतदान केले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. आता तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामुळे आता त्या अडचणीत आल्या आहेत. यामुळे नवा वाद उभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदान गुप्त असताना रुपाली पाटलांनी ते उघड का केले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. यामुळे आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

या पोट निवडणूकीसाठी चुरशीने मतदान होत आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, तर भाजपकडून हेमंत रासने अशी लढत कसब्यात होत आहे. कसब्याची पोटनिवडणूक पहिल्यापासूनच चर्चेत आहे. आज त्यात रुपाली पाटील यांच्या मतदान केंद्रातील फोटोमुळे भर पडली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, शुभ सकाळ. कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा. असा उल्लेख त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, त्यांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी कशी देण्यात आली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन त्यांच्यावर काय कारवाई होत का? हे आता लवकरच समजेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts