Sambhajiraje : संभाजीराजे छपत्रतींनी नाशिक लोकसभा निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. याठिकाणी सध्या दौरे देखील त्यांनी सुरू केले आहेत. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सध्या ते राज्यभर दौरे करत आहेत.
संभाजीराजे छपत्रतींनी वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शनिवारी नाशिकमध्ये आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करुन प्रचाराचा जणू नारळच फोडला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे अभिष्टचिंतन सोहळ्यातून त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. यामुळे आता त्यांनी मतदारसंघ फिक्स केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांनी स्वराज्यच्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार केल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्ष अवकाश असता तरी आतापासूनच उमेदवार तयारी करत आहेत.
दरम्यान, संभाजीराजे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त त्यांनी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंची मतेही जाणून घेतली. यामुळे अजून कोण कोण या मैदानात उतरणार यावर बरेच गणित अवलंबून आहे.
असे असले तरी पारंपारिक राजकीय पक्षांना पर्याय म्हणून स्वराज्य संघटना आता मैदानात उतरली आहे. त्यांना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात, पाड्यांवर शाखा व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल. हे आव्हान मोठे खडतर आहे.