Sandeep Deshpande : मुंबईतून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने, रॉडने हल्ला करण्यात आला आहे. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यालर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. हल्लेखोर मास्क लावून आले होते.
सध्या पोलिस त्यांचा तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. तसेच त्यांनी केलेल्या ट्विटमुळे देखील ते चर्चेत असतात.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून त्यांची विचारपूस करण्यात आली आहे. सध्या ते उपचार घेत आहेत. यावर अजून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सकाळी सकाळीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.