Sangram Jagtap News : विधानसभा निवडणुकीसाठी काल अर्थातच 20 नोव्हेंबर 2024 ला मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात काल मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली असून आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते निकालाकडे. यंदाचा निकाल कसा लागणार ? महाविकास आघाडी की महायुती कोण सत्तेवर येणार ? अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे विविध एक्झिट पोल वेगवेगळ्या आघाडींना बहुमत दाखवतायेत. यामुळे निकालाआधीच राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून अहिल्यानगर शहरातुन एक मोठी बातमी समोर येत आहे.
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. अर्थातच नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय.
त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादींच्या लढतीत कोणती राष्ट्रवादी बाजी मारणार, विद्यमान आमदार संग्राम जगताप हे हॅट्रिक लगावणार का असे अनेक प्रश्न आहेत. साहजिकच या साऱ्या प्रश्नांचे उत्तर 23 तारखेला समजणार आहे. मात्र तत्पूर्वीच नगर शहरात आमदार संग्राम भैया जगताप यांच्या विजयाचा जल्लोष होताना दिसतोय.
आमदार जगताप यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा तेच आमदार पदी विराजमान होतील अशी आशा आणि विश्वास जगताप यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात असून समर्थकांनी नगर शहरात त्यांच्या विजयाचे बॅनर देखील लावले आहेत.
नगर शहर ठिकठिकाणी आमदार जगताप यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले असून सध्या या बॅनरची संपूर्ण नगर शहरात आणि जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळतं आहे. विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन….! अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
हे बॅनर शहरातील अनेक चौकांमध्ये झळकत आहेत. त्यामुळे सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. खरेतर, कालच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे अन येत्या २३ तारखेला प्रत्यक्ष निकाल समोर येणार आहे.
मात्र त्याआधीच जगताप यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या विजयी मिरवणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली असून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलीये.