Satyajit Tambe : पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याची जोरदार चर्चा झाली. त्यांनी मोठा विजय देखील मिळवला. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यांची पुढची भूमिका काय असणार यावर त्यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, नाशिक पदवीधर निवणुकीत गेली २० ते २५ दिवस अनेक घडामोडी घडल्या, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे याविषयावर बोलायचे होते. किती निष्ठेने पक्षामध्ये काम केले. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रच दाखवली.
ते म्हणाले, हेतूपरस्परपणे आमची बदनामी केली, मी ज्यावेळी पक्षाच्या नेत्यांकडे मला संधी द्या, असे म्हणत होतो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत, असे सांगितले गेले.
मी एच. के. पाटील यांनाही सांगितले होते की, मला संधी द्या, मात्र संधी मिळाली नाही, यापुढे मी अपक्ष म्हणूनच कामे करेल. कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही ते म्हणाले. निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता ते पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेणार की भाजपसोबत हात मिळवणी करणार? याची युवकांमध्ये चर्चा सुरू होती. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरत केल आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे काम केल आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात.