राजकारण

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळा गाजणार, बडे राजकारणी अडकणार ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देवस्थान अत्यंत पवित्र. देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. शनिदेवांचा महिमा आघात आहे. दरम्यान या देवस्थानच्या विश्वस्तांनी विविध घोटाळे घातले असल्याचा आरोप सध्या केला जात आहे.

त्यामुळे या देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली आहे. विशेषसा म्हणजे शिर्डी आणि पंढरपूर येथे जो कायदा लागू आहे तोच येथे लागू करू असेही सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिशिंगणापूर तिर्थ क्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्ट्राचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाला असा मोठा आरोप केलेला आहे.

काय आहे आरोप? काय घडलं विधानपरिषदेत?

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. यात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्ट्राचार झाला असून कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा आहे असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यांनी असे म्हटले आहे की,

येथे कुठलीही जाहीरात न देता कर्मचारी भरती झाली आहे. धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली व निकालीही काढली असली तरी ती चौकशी झाली नसल्याचे ते म्हणाले. संस्थेचे स्पेशल ॲाडिट करावे लागणार असून सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास नेमून सर्व तक्रारींची चौकशी करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आक्रमक

या विरोधात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, ही लक्षवेधी दोन वर्षांपुर्वीच आली असून तब्बल दोन वेळा या आरोपांवर चौकशी झाली आहे. यातून काहीच निष्पन्न झालेलं नसल्याने शिळ्या कडीला पुन्हा ऊत आणण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

जाहीरात न देता कर्मचारी भरती केल्याचे धर्मादाय आयुक्तांनी चौकशीत मान्य केले असले तरी त्यांनी नंतर क्लिन चीट दिली. एकदा या संदर्भात उच्च स्तरीय चौकशी केली, स्पेशल ॲाडिट केले की मग अनेक गोष्टी, सत्य समोर येऊन जाईल. हे मंडळ बरखास्त करुन टाकण्याची बावनकुळे यांनी मागणी केली होती पण हे करता येणार नाही हे मी त्यांना समजावले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts