राजकारण

Sharad pawar : शरद पवारांना मोठा धक्का! विश्वासू प्रफुल्ल पटेलांवर ईडीची मोठी कारवाई

Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेकांवर ईडीची कारवाई सुरू आहे. माजी मंत्री नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का देत शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर मोठी कारवाई केली आहे.

यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यांचे घर असलेले वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. सील करण्याची कारवाई मागील वर्षीच करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

ईडीने याबाबत माहिती दिली आहे. या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत. दरम्यान, पटेल यांचे नाव दाऊदशी जोडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने याच इमारतीतील इतर दोन मजलेही सील केले आहेत.

हे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ईडीचे अधिकारी वरळी येथील सीजे हाऊस याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी चौथा मजला सील केला.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबियांच्या कंपनीने सीजे हाऊस इमारत बांधण्यात आली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. हे मजलेही ईडीने मागील वर्षी सील केले आहेत. आता पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts