राजकारण

Sharad Pawar : ‘शरद पवार यांचे नुसत नाव ऐकले तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने टीका करत आहेत. यावरून अनेकदा राजकीय वाद वाढतो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

मिटकरी म्हणाले, शरद पवार यांचे नुसत नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचे नुसते नाव जरी ऐकले की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा.

याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही. हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. यामुळे आता पडळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी ओळखणार नाही.

अजित पवारांनी जो अर्थसंकल्प मांडला तो स्वतःची घर भरणारा होता. पुणे जिल्ह्यात अशी कुठली कंपनी नाही ज्यामध्ये पवारांची भागीदारी नाही? अजित पवार त्यांच्या विधानसभा मतदारसंघाला पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत, असा आरोप पडळकरांनी केला. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले. पडळकर हे सातत्याने पवार कुटूंबावर टीका करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts