Categories: राजकारण

Sharad Pawar : ..म्हणून मी दरवेळेस पवारांवर बोलतो, गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केला धक्कादायक खुलासा

Sharad Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पडळकर म्हणाले, आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती.

तसेच धनगर समाजाला आरक्षणास विरोध करणारे लोक देखील पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एक आहे, म्हणून मी दरवेळेस पवारांवर बोलतो. शरद पवारांनी घाण व नीच काम केले आहे, असेही ते म्हणाले.

तसेच शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सरकार फुल स्ट्रॉंग आहे. सरकार पडणार नाही, असेही पडळकर यांनी सांगितले आहे.

अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना देखील आमचा एकही आमदार फुटला नाही. परंतु शरद पवार यांची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार त्यांना सोडून पळायला लागले. मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेचे 50 आमदार पळाले, असेही ते म्हणाले.

फडणवीस साहेबांनी एकच वाक्य टाकल्यामुळे शरद पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला आहे. पवारांचा चेहरा अगोदरच विश्वासघाताने गद्दारीने पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडलेला होता, असेही त्यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts