Shevgaon Pathardi Vidhansabha Matdarsangh : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडिंना वेग आला आहे.
खरतर येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान सध्या महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावर खलबत्त सुरू आहे.
तथापि महायुती मधील भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.
जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना बीजेपी ने पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पक्षात बंडखोरी झाली आहे.
खरे तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या यंदा अधिक वाढली आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी भारतीय जनता पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे यावेळी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी आधीच आपण कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असे म्हणतं तयारी सूरू केली होती. मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला होता.
त्यानुसार, हर्षदा काकडे यांनी यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या या निर्णयामुळे विद्यमान आमदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
खरे तर, काकडे या 2014 आणि 2019 मध्ये देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र पक्षाने सलग दोन वेळा त्यांना उमेदवारी दिली नाही. यंदा मात्र त्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
हर्षदा काकडे आणि त्यांचे पती विद्याधर काकडे मागील 40 वर्षांपासून या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य आहेत. यासोबतच शैक्षणिक संस्था आणि सामाजिक कामामुळे या दाम्पत्याची मतदारसंघात चांगली ओळखही आहे.
हे सगळं असलं तरी शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत अन यंदा त्यांनाच तिकीट मिळाले आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाण्याची प्रबळ शक्यता असून या ठिकाणी प्रताप ढाकणे निवडणुकीची तयारी करत आहेत.
हेच कारण आहे की काकडे यांनी यावेळी अपक्ष उमेदवारीचा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र हर्षदा काकडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही बहुरंगी होणार आहे.