मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
कोणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचं सरकार आहे. तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईमध्ये आहे. ‘मातोश्री’वर. दिल्लीला नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीला कधीच जात नाही. गेला नाही. त्यामुळे आपोआप सर्वांचे मुखवटे गळून पडत आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीत. भाजपचे आहेत. त्यांचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यामुळे ते दिल्लीला गेले आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे हा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. सीमाभागातून बातम्या येत आहेत. मराठी लोकांवर अत्याचार सुरु आहे. आता राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रात भाजपचे सरकार आङे. सीमाभागाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. तोपर्यंत तो भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली मांडावी. तो निर्णय उद्धव ठाकरेच घेतील.
द्रोपदी मुर्मू या आदिवासी सामाजातील आहेत. त्यामुळे देशातील सर्व आधिवासी खासदारांना वाटतं की त्या राष्ट्रपती होतील. मराठी राष्ट्रपती करण्याचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा आम्ही मोठा निर्णय घेतला होता. यावेळी आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील. खासदारांची वेगळी बैठक नाही. विचारांचे अदानप्रदान झाले असेल. अलिकडे मध्यरात्री विचारांचे अदानप्रदान होते, असा टोलाही यावेळी संजय राऊतांनी लगावला आहे.