Shivsena Symbol : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
असे असताना ठाकरे गटाकडून यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला असल्याचे सांगितले जात आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेना या चार अक्षरांसाठी हा सौदा झाला आहे. नगरसेवक 50 लाख, आमदार 50 कोटी, खासदार 100 कोटी असे ज्या पक्षाने दिले त्याने शिवसेना आणि धनुष्यबाण ताब्यात घेण्यासाठी किती मोठा सौदा केला असेल याचा हिशोब लागणार नाही.
तसेच हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. 2000 कोटी यासाठी खर्च झाले. ही माहिती त्यांच्याच बिल्डरांनी मला दिली. मी माझ्या मतावर ठाम आहे, असा खळबळजनक गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाही. ही डील आहे.
हा सौदा आहे. हे सरकार खोक्यातून निर्माण झाले आहे. नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवले गेले आहेत. अनेक गोष्टी विकत घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रही विकत घेतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना नाव आणि चिन्ह देखील गमवावे लागले आहे. यामुळे आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत.
यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहीर झाला आहे.