राजकारण

आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, मीही काम करीत राहिलो, आता विक्रमला साथ द्या ! बबनरावं पाचपुते विकीदादासाठी मैदानात

Shrigonda News : श्रीगोंदा नाव आलं की आपसूक ओठांवर बबनराव पाचपुते यांचे नाव येते, कारण म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी सात वेळा प्रतिनिधित्व केलंय.

श्रीगोंदा हा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. या मतदारसंघात बबनराव पाचपुते यांनी विविध पक्षांच्या तिकिटावर आमदारकी भूषवली हे विशेष.

अर्थातच या ठिकाणी पक्षापेक्षा नेत्याला अर्थातच बबनदादा पाचपुते यांना अधिक महत्त्व आहे. पण, यावेळी बबनराव पाचपुते आजारपणामुळे निवडणुकीत उभे राहिले नाहीत.

बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे विकीदादांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात देखील झाली आहे.

महायुतीकडून भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचार प्रारंभानिमित्त केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. महायुतीच्या या प्रचार सभेला सर्वसामान्य नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, बाळासाहेब महाडिक, मिलिंद दरेकर, शरद नवले, आदेश शेंडगे आदींची भाषणे झाली. दिलीप भालसिंग, अशोक सावंत, सुवेंद्र गांधी, भगवानराव पाचपुते, अरुणराव पाचपुते, सचिन जगताप, पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे, संदीप नागवडे, सुनील दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.

यावेळी जाहीर सभेला संबोधित करतांना ज्योतिरादित्य शिंदे यांनी असे म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडी नसून, ती महाविनाश आघाडी आहे. निवडणुकीत आघाडीला कुलूप लावून हद्दपार करा. महायुती सरकारच्या थेट लाभाच्या योजनांमुळे सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत सरकार पोहोचले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आमच्या बहिणींची दिवाळी गोड झाली. विक्रम पाचपुते यांच्या रूपाने माझा लहान भाऊ विधानसभा निवडणुकीत उभा राहिला आहे, त्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन देखील ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी केले.

राज्य व केंद्रातील सरकार शेतकरी, महिला, गरीब सर्वांसाठी योजना राबवित आहे. देशातील १४० कोटी जनतेचा विकास हेच भाजपचे धोरण असून, त्यासाठी विक्रम पाचपुते यांना मत्ताधिक्य देऊन भाजपला साथ द्या असं म्हणतं यावेळी ज्योतिरादित्य यांनी मतदारांना साद घातली. यावेळी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.

बबनदादा काय म्हणतात ?
श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना असे म्हटले की, मी सातवेळा आमदार झालो याचा अभिमान आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले. मीही काम करीत राहिलो. आता विक्रमला साथ द्या, राज्यात सर्वाधिक मताधिक्याने त्याला विधानसभेत पाठवा.

विक्रमदादा म्हणतात….
श्रीगोंद्याचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रम बबनराव पाचपुते यांनी, आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नांतून राज्यातील सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघात आलाय.

मतदारसंघातील प्रत्येक गावात मोठा निधी देण्यात आम्हाला यश आले आहे. म्हणून पुन्हा एकदा विकासासाठी भाजपला साथ द्या, असे म्हणतं आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts