Shrigonda Vidhansabha Nivdnuk : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस.
आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बाकी असणाऱ्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. दरम्यान, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे.
काल, सोमवार दिनांक २८/१०/२०२४ रोजी अगदी साध्या पद्धतीने, कुठलाही बडेजावं अन गाजावाजा न करता पाच लोकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा असे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या पत्नी बीजेपीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी ठरवले होते.
मात्र प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हि बातमी तालुक्यात कळताच दादांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सकाळीच माऊली या निवासस्थानी हजर झालेत.
दरम्यान, भाजपाच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ व आमदार बबनराव पाचपुते व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
यावेळी महिला आघाडीचा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ म्हणाल्यात की, नेत्यावर एवढे प्रेम करणारे कार्यकर्ते हिच नेत्यांची खरी संपती असते अन विकी दादांच भाषण ऐकल्यानंतर मला दादांच्या (लोकप्रिय नेते बबनरावं पाचपुते) जुन्या भाषणांची आठवण झाली.
यावेळी विक्रमसिंह पाचपुते, प्रतिभाताई पाचपुते, आमदार चित्राताई वाघ यांच्यासह लोकप्रिय नेते आमदार बबनरावजी पाचपुते यांनी उपस्थितीत जनसमुदायास संबोधित केले. यंदा आजारपणामुळे बबनराव पाचपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीयेत.
मात्र भारतीय जनता पक्षाने पाचपुते कुटुंबावर विश्वास दाखवत पाचपुते कुटुंबालाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे अन प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज भरताना आमदार बबनराव पाचपुते हे आजारी असल्यामुळे उपस्थित कार्यकर्ते भावुक झालेत. अनेकांचे डोळे पाणावलेत.
तसेच, उपस्थितीत कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या घोषणानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. एकच वादा बबन दादा, विचार पक्का आमदार आक्का, देख लेना तुम आंखोसे जीत कर आयेंगे लाखोंसे अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्यात.