State government ; राज्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. असे असताना हे सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले जाते. तसेच कोर्टात अनेक सूनवण्या देखील बाकी आहेत. यामुळे सरकारने टिकणार की पडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
असे असताना आता मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने हे सरकार पडेल असे म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दोन पक्षांमधील धुसफूस वाढेल. तसेच सरकार आधीच अस्थिर आहे, मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते कोलमडेल, असे म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. या दाव्यामुळे आता सरकार पडणार का? असे म्हटले जात आहे.
ते म्हणाले, विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे यांची शिवसेना पक्षाचे नेते बिथरले आहेत. राज्यात बदलाचे वारे आहे, त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा सरकार कोलमडण्यासाठी कारण ठरू शकतो, असे म्हटले आहे.
दरम्यान, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नाराज झालेल्या अनेक आमदारांची धुसफूस वारंवार समोर आली आहे. हे आमदार अनेक वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. आता दुसऱ्या विस्तारात आमदारांची नाराजी सरकारला झेपणार नाही, यामुळे सरकार पडेल असेही ते म्हणाले.