राजकारण

सुजय विखेंचा विधानसभा निवडणुकीतुन पत्ता कट! संगमनेरात शिंदे गटाने उतरवला आपला भिडू

Sujay Vikhe Patil News : संगमनेर विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. चर्चेत येण्याचे कारण असे की येथे विखे विरुद्ध थोरात अशी लढत होण्याची शक्यता होती.

महत्त्वाचे म्हणजे यासाठी विखे पिता पुत्र यांनी तयारी देखील सुरू केली होती. स्वतः माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेरात तळ मांडून बसले होते.

त्यांनी संपूर्ण संगमनेर मतदार संघ अक्षरशा पिंजून काढायला सुरुवात केली होती. अनेक गावांमध्ये त्यांनी सहभाग घेतल्या होत्या. त्यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

पण आता संगमनेरात एक वेगळच समीकरण पुढे आला आहे. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी न देता शिवसेनेने इथं आपला उमेदवार उतरवला आहे. खरंतर सुजय विखे पाटील यांच्या एका जाहीर सभेत वसंतराव देशमुख यांनी संगमनेर चे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं.

या विधानामुळे देशमुख यांना अटकही झाली. मात्र यानिमित्ताने सुजय विखे पाटील यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे अहिल्यानगरचं राजकारण चांगलंच पेटलं होतं. याचा फटका आता विखेंना बसला आहे.

कारण की, आतापर्यंत संगमनेर मध्ये शक्ती प्रदर्शन करणाऱ्या डॉ. सुजय विखे पाटील यांना महायुतीने तिकीट नाकारले आहे. संगमनेरमधून शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे.

शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते आता धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. अर्थातच यंदाही थोरात विरुद्ध खताळ असाच सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेर मध्ये थोरात विरुद्ध विखे अशी लढत होणार या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून येथून महायुतीकडून अमोल खताळ हे मैदानात उतरणार आहेत.

शिंदे गटाने काल आपल्या 15 अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नेवासा, श्रीरामपूर आणि संगमनेर या तीन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाची तिसरी यादी

संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर-भाऊसाहेब कांबळे
नेवासा-विठ्ठलराव लंघे पाटील
सिंदखेडराजा- शशिकांत खेडकर
घनसावंगी- हिकमत उढाण
कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबापुरी- शायना एन सी
धाराशिव-अजित पिंगळे
करमाळा-दिग्विजय पाटील
बार्शी-राजेंद्र राऊत
गुहागर-राजेश बेंडल
हातकणंगलेज-अशोकराव माने
शिरोळ-राजेंद्र यड्रावक

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts