Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय झाले आहेत.
नगर शहर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील संग्रामभैय्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आ. संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २ मध्ये नुकतीच विकास यात्रा संपन्न झाली.
या विकास यात्रेला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही आमदार जगताप यांचा प्रचार केला. यावेळी बोलतांना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार जगताप यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणालेत की, आ. जगताप व मी शहर विकासाची संकल्पना हाती घेऊन मुहूर्तमेढ रोवली आणि विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. या पुढील काळात सुद्धा नगरमध्ये चांगले काम उभे केले जातील.
आम्ही समृद्ध नगरची निर्मिती करू, असेही सुजय विखे पाटील यांनी यावेळी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती पूर्णपणे सज्ज झाली आहे. जगताप महायुतीचे उमेदवार आहेत तसेच ते माझे मित्र सुद्धा आहेत. नगरमधून आमदार संग्राम जगताप ५० हजार मतांनी विजयी होतील.
त्यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले काम केले होते. त्यावेळी मला कठीण परिस्थिती असतांना सुद्धा येथून ३५ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. आता तर फारच चांगले वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे.
त्यांनी केलेल्या विकास कामावर नगरकरांनी विश्वास ठेवलाय, असं म्हणतं सुजय विखे पाटील यांनी विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप हेच नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे पुढील आमदार असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकंदरीत नगर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महायुतीकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. यामुळे नगरचा पुढचा आमदार कोण असेल? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.