Swati Maliwal : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी स्वत:च्याच वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्या म्हणाल्या, लहान असताना माझे वडील माझं शोषण करायचे, ते मला मारत असत, तेव्हा मी पलंगाखाली जाऊन लपायचे. ते घरी यायचे तेव्हा मला फार भीती वाटायची. मी लहान होते, अनेकदा मी पलंगाखाली जाऊन लपायचे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. त्या म्हणाल्या, रात्रभर मी याची प्लानिंग करायची की, महिलांना त्यांचे अधिकार कसे मिळवून द्यायचे, महिलांचे, लहान मुलांचे शोषण करणाऱ्यांना कशा पद्धतीने अद्दल घडवायची, असेही त्यांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या विद्यमान टीमला दुसरी टर्म देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.
स्वाती मालीवाल या २०१५ पासून सतत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख आहेत. त्यांनी म्हटले की, ही घटना तेव्हाची आहे जेव्ही मी खूप लहान होतो. मी चौथ्या वर्गात असेपर्यंत वडिलांसोबत राहिलो.
मी जोपर्यंत त्यांच्यासोबत होते तोपर्यंत अनेकवेळा माझ्यासोबत हे घडलं आहे. यामुळे आता महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.