Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात येणारा मी पहिला नेता होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून नवी सुरुवात माझ्या येवला मतदारसंघातून केली, अशी उपरोधिक टीका राज्याचे कॅबिनेट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
पवारांच्या सर्वात जवळचा मी असल्यामुळे त्यांच्याकडून असे होणे स्वाभाविक होते. येवल्यातील सभेत पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी रविवारी देईन, सांगत ‘पिक्चर अभी बाकी है अशा शब्दांत भुजबळांनी शरद पवार यांना गर्भित इशारा दिला.
प्रथमच नाशिकमध्ये परतलेल्या भुजबळ यांनी रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका मांडली. भुजबळ म्हणाले की, ‘मंत्रीपद माझ्यासाठी नवीन नाही. अनेक वेळा सत्तेत आलो व सत्तेबाहेर राहूनही काम केले.
२०१४ नंतर मात्र देशात बिकट परिस्थिती आली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना जे चुकीचे निर्णय झाले, त्याचे परिणाम सर्वांनी भोगले. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व काही स्पष्ट केल्यामुळे पुन्हा ते सांगणार नाही, असे सांगत भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
‘सेफ मतदारसंघ म्हणून भुजबळांना येवला दिल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत भुजबळ म्हणाले की, साहेबांना विस्मरण झाले आहे. एरंडोल, जुन्नर, व येवला अशा चार बैजापूर व मतदारसंघांतून निवडणुकीसाठी आग्रह धरला गेला होता. येवला की जुन्नर हा प्रश्न होता.
जुन्नर हे माझ्या वडिलांचे गाव असल्यामुळे, तसेच या गावातील अनेकांचा संबंध मुंबईतील भायखळा भाजीबाजाराशी असल्यामुळे येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. मात्र येवल्यातील अनेकांनी ‘रामटेक’ बंगल्यावर येत या मतदारसंघातूनच निवडणुकीचा आग्रह धरल्यामुळे तेथून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याचे भुजबळ म्हणाले.
पहिले लक्ष्य मीच!
भुजबळ म्हणाले की, राज्यातील सर्व दौरे शरद पवार यांनी रद्द केले. मात्र ते येवल्यात आले. कदाचित माझ्यावरचे प्रेम म्हणा की अधिकार त्यांनी येवल्याची निवड केली असेल. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा पक्षात येणारा मी पहिला होतो. • पहिला प्रांताध्यक्षा मीच झालो. त्यामुळे येवल्यापासून सुरुवात करण्याचे कारण मीच आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांचे पहिले लक्ष्य मीच असेन, असे भुजबळ यांनी सूचित केले.