मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे सरकार आल्यापासून शिवसेनेतील वाद काही संपताना दिसत नाही. सभागृहातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तक्रारी सांगत शिवसेनेतील नेत्यांवर ताशेरे ओढले. त्यातच आता सामनामधून नव्या सरकारवर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
फुटीर गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात, ‘त्यांच्यासोबत गेलेल्या पन्नासेक आमदारांपैकी एकाचाही पराभव होऊ देणार नाही’ हा महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेवर दाखवलेला अविश्वास म्हणावा लागेल. जसे आमदार विकत घेता येतात तसे मतदारांनीही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास?, असे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हंटले आहे.
बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माला आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताबा घ्यायचा व मागाहून घ्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे
, अशीही टीका सामनातून करण्याती आली आहे.मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना त्या सर्व प्रकारास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे, छगन भुजबळ वगैरे नेते जसे भावूक झाले होते, तोच आव एकनाथ शिंदेंनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले, त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या असे बरेच नाट्य घडले असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे.