राजकारण

आज फडणवीसांनी त्यांचा माईक हिसकावला उद्या….; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिले होते. शिवसेनेमधील नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी केलेल्या कृत्यावरुन टीका केल्याचे पहायला मिळाले.  

काल एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांसमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिसकावून घेतला. आज माईक हिसकावला, उद्या काय काय हिसकातील हे काही जणांना समजणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, काल विधानसभेमध्ये रिक्षा सुसाट सुटली होती, त्याचा ब्रेक लागतोय की नाही, त्याचा अपघात होतोय की काय असं अनेकांना वाटत होतं, असाही खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts