राजकारण

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत.

शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल.

या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार असून मतदान प्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. दरम्यान या दोन्ही मतदार संघात एकूण मतदार किती आहेत याचा एक लेखाजोखा पाहुयात.

एकूण 36 लाख 35 हजार मतदार

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 36 लाख 35 हजार मतदार आहेत. यामध्ये जवळपास 2 हजार मतदार वयाने शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात 287 मतदार म्हणजे सर्वाधिक मतदार आहेत.

तर सर्वात कमी अकोले विधानसभा मतदारसंघात 68 मतदार असून या एकंदरीत मतदारांत एक 110 वयाचा व एक 120 वयाचा मतदार आहे.

मतदार संघनिहाय नजर टाकली तर शंभरी गाठलेले मतदार – अकोले : 68, संगमनेर : 83, शिर्डी : 131, कोपरगाव : 131, श्रीरामपूर : 149, नेवासे : 139, शेवगाव : 388, राहुरी : 118, पारनेर : 227, नगर शहर : 93, श्रीगोंदा :96, कर्जत-जामखेड : 278 असे आहेत.

18 ते 19 वयोगटातील 46 हजार तर 20 ते 30 वयोगटातील 6 लाख मतदार

जिल्ह्यामध्ये एकूण मतदारांपैकी वय 18 ते 19 गटातील 46 हजार 539 मतदार असून 20 ते 30 वयोगटातील 6 लाख 92 हजार 560 मतदार असल्याची माहीत मिळाली आहे.

 30 ते 40 वयोगटातील आहेत सर्वात जास्त मतदार

जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक मतदार 30 ते 40 वयोगटातील असून जवळपास हा आकडा सात लाख 90 हजार 357 इतका आहे. 41 ते 50 वयोगटातील सात लाख 71 हजार 891 मतदार असल्याची माहिती समजली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts