राजकारण

अहमदनगर जिल्ह्यातील विखेंच्या प्रयत्नातील दोन एमआयडीसी मंजूर, आ.पवारांना मात्र कात्रजचा घाट ! प्रा. राम शिंदे यांनी ‘गेम’ केली?

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसींबाबत चर्चा सुरु होती. यातील दोन एमआयडीसी की ज्या महसूलमंत्री विखे यांच्या नियोजनानुसार नगर तालुक्यात व शिर्डीत होतील त्यांना मंजुरी मिळाली आहे.

नगर तालुक्यातील एमआयडीसीसाठी जागेचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. परंतु तिसरी एमआयडीसी की जी आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड साठी सुचवली होती ती अजूनही भिजत घोंगडेच आहे. कारण त्यांनी जी जागा सुचवली होती त्याला आ. राम शिंदे यांनी विरोध केला व मंत्रालयातून लगेच प्रस्तावित जागा नाकारून नवीन जागेचा शोध घेण्यास सांगितले.

त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व त्यांचे प्रतिस्पर्धी आ. प्रा. राम शिंदे यांच्यात शह, कट-शहाचे राजकरण सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जत एमआयडीसीच्या जागेबाबत फेर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर आ. पवारांनी सुचवलेल्या जागेऐवजी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कर्जत जवळील इतर नऊ जागांची पाहणी केली आहे.

एमआयडीसीसाठी या जागेंची केली पाहणी

औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी कर्जत जवळील कोंभळी, थेरगाव, रवळगाव, वालवड, सुपा, पठारवाडी, अळसुंदा, देऊळवाडी व सिद्धटेक या भागातील जमिनीची पाहणी केली. त्यामुळे आता आ. रोहित पवारांनी सुचवलेल्या जागे ऐवजी अन्य ठिकाणी एमआयडीसी होईल असे तरी चित्र आहे.

अंतिम निर्णय भूसंपादन समितीकडे

औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी माहिती दिली आहे की, औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी कर्जत परिसरातील काही जागांची प्राथमिक टप्यातील पाहणी केली आहे.

जागेबाबत अंतिम पाहणी औद्योगिक विकास महामंडळाची बोलीवड (भूसंपादन समिती) करून तसेच जागेबाबतीत तात्रिक अडचणी पाहूनती जागा निश्चित करेल असे ते म्हणाले आहेत.

आ. प्रा. राम शिंदे काय म्हणतात –

आ. प्रा. राम शिंदे म्हणतात की, कर्जतच्या नियोजित एमआयडीसीसाठी लागणाऱ्या जागेचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. आता एमआयडीसीच्या पुढील कामकाजाला वेग येणार आहे. निश्चित केलेल्या जागेवर शिक्का मोर्तब करून मंजुरी घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.

मला जनतेचा आशीर्वाद : आ. रोहित पवार

सध्या एमआयडीसीवरून सुरु असणाऱ्या घडामोडींवर आ. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, मतदारसंघातील लोकांसाठी माझा पाठपुरावा कायम सुरू असणार आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेला दिलेले बहुतांश शब्द मी जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. आता एमआयडीसी प्रश्नही मी मार्गी लावेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts