राजकारण

Udayanaraje : बँक, संस्था, लोकांचे पैसे खाल्ले दुर्दैवाने सांगावसं वाटतं हे लोक मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?’

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे आणि आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात नेहेमी टीका टिप्पणी सुरू असतात. आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. जर लोकांनी सांगितले की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन, असे उदयनराजे म्हणाले.

तसेच ते म्हणाले, माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केलं आहे, आम्ही मान्य करू. लोकांनी सांगितले तर उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड ताखवणार नाही, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनी लोकांचे पैसे खाल्ले. दुर्दैवाने मला सांगावस वाटत की, असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

तसेच आमच्या दारात कधी कोण आल नाही, आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींना उदयनराजे म्हणाले की, हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. आता शिवेंद्रसिंहराजे काय उत्तर देणार हे लकरच समजेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts