Udayanaraje : साताऱ्यात अनेकदा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे आमने सामने आल्याचे चित्र बघितले आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गटाने कोणत्याही परिस्थितीत खासदार गटाला बाजार समितीत शिरकाव करू न देण्याचा निर्धार केला आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही राजांचे समर्थक समोरासमोर भिडणार आहेत. आमदार गटाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मागील वेळी खासदार उदयनराजेंच्या गटाचे सात संचालक होते.
असे असताना त्यांनी तक्रार अर्ज देऊन राजीनामे दिले होते. आमदार गटाचे सध्या ११ संचालक होते. आता यावेळेस सर्वच्या सर्व १८ जागांवर आमदार गट लढणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. दोन्ही राजांच्या समर्थकांची पॅनेल एकमेकांविरोधात भिडणार आहेत.
दरम्यान, मतदारांची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये मतदारांची नेमकी संख्या समजणार आहे. आमदार गटाकडे सोसायटीचेच १७०० मतदार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जोरदार तयारी सुरू झाली आहे.