राजकारण

Udayanraje : जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, उदयनराजे गहिवरले, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजेंचा दिलदार स्वभाव त्यांच्या अनेक गोष्टीतून नियमित पाहायला मिळतो. त्यांची वेगळीच स्टाईल तरुणांना खूपच आवडते. उदयनराजे यांचे अनेक किस्से लोक नियमित सांगत असतात. असाच एक प्रसंग उदयनराजे यांच्या कार्यालयात घडला.

उदयनराजे यांचा जनता दरबार सुरु असताना तेथे एक आजीबाई आल्या. त्यांनी उदयनराजे यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उदयनराजेही थोडे गहिवरले, याचे फोटो उदयनराजे यांनी शेअर केले आहेत. उदयनराजे भोसले हे साताऱ्यात असल्यानंतर दररोज जनता दरबार भरतो. त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

दरम्यान, त्यांनी आजींना नमस्कार केला. आजींना त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. उदयनराजे म्हणाले, आम्हाला नियमित भेटणाऱ्या नागरिकांपैकी एक आजी आज भेटायला आल्या. आमची आस्थेने विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला.

माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमळ लोकांचे आशीर्वाद व खंबीर साथ माझ्या पाठीशी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. असेच आशीर्वाद मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे ट्विट उदयनराजे यांनी केले आहे.

दरम्यान, यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असे प्रेम सगळ्यांनाच मिळते असे नाही. ज्यांना हे मिळाले ते खरच धन्य! कारण राजकारण म्हटले की खुर्ची आणि पैसा हेच सध्याचे समीकरण आहे. मात्र, उदयनराजे त्यापेक्षा वेगळे आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts