राजकारण

Uddhav Thackeray: पक्ष आणि धनुष्यबाण गमावल्यांनतर ठाकरे यांची राजकीय खेळी, उचलले मोठे राजकीय पाऊल..

Uddhav Thackeray :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडून केवळ सत्ता हिसकावून घेतली नाही, तर त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना आणि निवडणूक चिन्हही काढून घेतले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते.

यामुळे ठाकरे गट काहीसा मागे पडला असल्याचे दिसून आले आहे. असे असताना आता उद्धव ठाकरे यांनी राजकीय ‘बेरीज’ करीत, भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येणाऱ्या काळात त्यांना किती फायदा होणार हे लवकरच समजेल.

त्याचाच भाग म्हणून मुंबईत काहीशी ताकद असलेल्या समाजवादी पक्षासह आम आदमी पक्ष आणि आजाद समाज पक्ष प्रमुख नेत्यांना बोलावून ठाकरे यांची चर्चा केली. पक्ष संघटनेच्या पडझडीनंतरही मुंबई महापालिका निवडणुकीत अस्तित्त्व राखण्यासाठी ठाकरे यांची धडपड आहे. यामुळे सध्या ते ताकद पणाला लावणार आहेत.

सध्या निवडणुका झाल्यास मुंबई महापालिकेतील ठाकरे वर्चस्वाला सुरूंग लागण्याची भीती आहे. सध्या पक्षच शिंदे यांच्याकडे गेल्याने महापालिका निवडणुकांना मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे ठाकरे देखील तयार राहणार आहेत.

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या नेत्यांना ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर बोलावून पाहूणचार केला. या पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची ठाकरे यांची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकांत भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे जयस्वार यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts