Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता.
सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यामुळे आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत अडचणीत आले आहेत. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात तीन जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने तिघांना हजर राहण्यासाठी समन्य बजावले आहे. १७ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
याबाबत न्यायालयाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना बदनामीकारण आरोप करण्यापासून रोखण्यात यावं, अशी विनंती राहुल शेवाळे यांचे वकील राजीव नायर यांनी न्यायालयाला केली. हे राजकीय प्रकरण आहे. प्रतिवाद्याचे मत ऐकूनच निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या अनेक अडचणी वाढल्या आहेत. अनेकदा कोर्टाचे निर्णय देखील विरोधात जात आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.