राजकारण

Uddhav Thackeray : सोडून गेलेले हात पुन्हा एकत्र, अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना केलेल्या नमस्काराची चर्चा

Uddhav Thackeray : सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले 40 आमदार आज उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ठाकरे गटातील नेते हे शिंदे गटावर टीका करतात. तर त्या टीकेला उत्तर देण्याचे काम शिंदे गटाकडून होत असते. असे असताना आज एक वेगळेच चित्र बघायला मिळाले.

जे हात ठाकरेंना सोडूण गेले तेच आज त्यांच्यासमोर जोडले गेल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात आले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते.

यावेळी तेथे दीपक केसरकर होते. त्यांनी शिंदे गटातील केसरकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत असतानाच केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. दोनवेळा असेच घडले. यामुळे पुन्हा पुन्हा नमस्कार केल्याने उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला.

याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान आज सभागृहात याचीच चर्चा रंगली होती. सध्या याचीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गट हे रोज एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts