Uddhav Thackeray : सध्या उद्धव ठाकरे हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. पक्ष चिन्ह गेल्यानंतर सध्या त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. आधीच त्यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना त्यांच्याकडे काही जुने शिवसैनिक आहेत. ते आता ठाकरे यांची खिंड लढवत आहेत.
यामध्ये आता गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडल्या आहेत. यामुळे वातावरण गरम झाले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्या शत्रूला सोडणार नाही.
उत्कृष्ट जगातील, देशातील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाव कमावले आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीत आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगत उद्याचा निकाल लागला की एक एक पिस कसं काढायचं याची तयारीच करा.
आपण डोक्यावर कफन बांधूनच काम करतो आहे. शिवरायांची शपथ घेउन सांगते की कुठलेही वाईट काम केले नाही. पण आम्ही ठाकरे ब्रँड सोबत आहोत म्हणून त्रास दिला जातो आहे. तसेच आमची मशाल यांच्या बुडाला लागणार आहे आणि यांना टेकू दिले जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर औरंगाबादमध्ये बोलत होत्या. यामध्ये त्यांनी सर्वांवरच निशाणा साधला आहे. सध्या अधिवेशन देखील सुरू आहे. त्यामध्ये देखील मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच जुंपली आहे.