Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार माजी राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याची चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्या खेड दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली असली तरी रामदास कदम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ठाकरेंचा सत्कार केला. यामुळे याचीच चर्चा सध्या खेडमध्ये सुरू आहे.
सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधू आहेत. रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये ही भेट घेण्यात आली. त्यानंतर कदम कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे रामदास कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कदम कुटुंबातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यावरुन मतभेद असल्याचं बघायला मिळत आहे. यामुळे याचा प्रत्यय येणाऱ्या निवडणुकीत येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी या सभेत रामदास कदम यांच्यावर नाव घेऊन टीका केली नाही.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते, आता काहीजण दिल्लीत मुजरा करायला जात आहेत. राज्याचे उद्योग सध्या बाहेर जात आहेत. मात्र यावर कोण बोलत नाही.