Vasant More : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सतत चर्चेत असतात. कोरोना काळात ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. असे असताना आता वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे यामागे कोण आहे याचा तपास पोलीस तपास करत आहेत.
यामध्ये वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आले आहे. यामुळे आता पोलीस तपास करत आहेत.
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवत फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या एक मेसेज आला आहे. तो कुठून आला याबाबत अजून तपास केला जात आहे.
दरम्यान, अल्फिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करण्यात आला आणि वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश मोरे याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, वसंत मोरे हे मनसेचे धडाकेबाज नेते आहेत. कोरोना काळात त्यांनी आयुक्तांची गाडी फोडली होती. तसेच ते सतत चर्चेत असतात. आता त्यांच्या कामांमुळे देखील ते चर्चेत असतात. आता या धमकीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.