Ahmednagar Politics : ज्या शरद पवारांनी २०१९ च्या निवडणुकीच्या सभेत आ. आशुतोष काळे यांच्या विजयाची हमी घेतली होती. निवडून आणले, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद दिले, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे चेअरमन केले.
त्यामुळे जे पवारांचे होऊ शकले नाही ते मतदारांचे काय होणार मस्त सवाल, असा सवाल शरद पवार यांची कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष दिपक साळुंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी एकही फलक लावला नाही. प्रसिद्धीसाठी आणि मतांसाठी पवार आणि स्वार्थ दिसताच वेळ पाहून राजकीय भूमिका घेण्याची काळे यांची निती असल्याची भावना जनमानसात झाली आहे.
राजकारण हे नीतिमत्ता जपून करावे, मात्र केवळ सत्तेची संधी हवी, म्हणून ज्यांनी डोक्यावर वरदहस्त ठेवला. म्हणून आपण विजयी झालो होतो, हे विसरने हे दुर्दैव आहे.
काळे यांनी नेहमी सत्तेसाठी पर्यटन म्हणून विविध पक्षाची भटकंती केली असल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे. अतिशय मोठ्या संधी देऊनही जे शरद पवार यांना विसरले, अशा काळे यांना इतर कार्यक्रमात पवारांचा फोटो वापरण्याचा नैतिक अधिकार नाही.
संधी साधू राजकारण करणे हा प्रकार काळे यांनी थांबवावा. कारण जनतेला सर्व लक्षात आले आहे. ज्या पवार यांनी संधी देऊन मोठे केले. त्यांचे काळे झाले नाही, तर ते जनतेचे काय होणार असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही, असेही साळुंके म्हणाले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांनी परीस्थितीप्रमाणे फलक लावले. मात्र ज्यांना पवारांनी मोठे पदे दिली. त्यांनी संकटकाळी पवारांची साथ सोडून जात धोका दिल्याने ते कधीच जनतेचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, अशी चर्चा शहरात रंगली आहे.