राज्यातील विधानसभा निवडणूक कधी लागेल याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुका साधारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील अशी माहिती अंतर्गत सूत्रांकडून कळाली आहे.
२६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन विधानसभा येईल असे म्हटले जात असल्याची माहिती समजली आहे. दरम्यान विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रितपणे व महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे.
त्यासाठी २० तारखेपासूनच महायुतीच्या संयुक्त सभांना सुरुवात होत आहे. सर्वांनी मन लावून काम केले तर आपण सहज दोनशे जागा पार करू.
सर्वांनी मन लावून काम करावे असे महायुतीच्या बैठकांत सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील दोनशे पार चा नारा देत आहे.
कधी लागेल आचारसंहिता ? कधी लागेल निवडणुकांचा निकाल?
२६ नोव्हेंबरला निवडणूक होतील असे गृहीत धरले तर साधारण त्याच्या ४५ दिवस आधी १२ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू होऊ शकते असा अंदाज आहे. ३ नोव्हेंबरला दिवाळी असेल तर त्यानंतर दिवाळी ३ नोव्हेंबर रोजी संपेल.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जर मतदान झाले तर साधारण १४ किवा १५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होऊन विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याकरिता बरोबर पुढचे १२ दिवस शिल्लक राहतील.
महायुतीची एकत्रित तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने एकत्रितपणे तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सध्या बैठका सुरु आहेत. लोकसभेला पदरी पडलेले अपयश मिटवून टाकण्यासाठी आता महायुती प्रयत्नशील असेल.
तसेच उमेदवारी कोणालाही मिळो, सर्वांनी तो आपलाच उमेदवार समजून काम करावे. कारण आमदारकीनंतर होणारी महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक तुमची आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही सध्या अनेकांना देण्यात असल्याचेही चर्चा आहे.