राजकारण

Loksabha Elections : १६ एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार ? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…

Loksabha Elections : देशात लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नाही. परंतु, आगामी १६ एप्रिल २०२४ रोजी संसदीय निवडणूक होणार असल्यासंबंधित दिल्ली निवडणूक आयोगाचे एक पत्र मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाले.

त्यामुळे निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्याच्या चर्चेला पेव फुटले. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी फक्त संदर्भ म्हणून १६ एप्रिल ही तारीख तात्पुरत्या स्वरूपात नोंद केल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाबाबतच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

केंद्रातील सत्तारूढ भाजप, काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांची इंडिया आघाडी व इतर राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. देशभरात सभा, राममंदिर उ‌द्घाटन, भारत जोडो यात्रा आणि इतर राजकीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

मतदार नोंदणी अभियानसुद्धा सुरू आहे, अशातच दिल्ली निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून ११ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेले एका परिपत्रक सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यात, १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याचे नमूद आहे.

हे पत्र व्हायरल झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. निवडणूक कार्यक्रम ठरल्याच्या चर्चेला सोशल मीडियात उधाण आले. दरम्यान, याबाबत पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

त्यानंतर दिल्लीच्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अजूनही ठरला नाही. १६ एप्रिल या तारखेचा उल्लेख केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमाची तयारी करण्याच्या अनुषंगाने करण्यात आला, असा खुलासा दिल्ली निवडणूक आयोगाने केला. त्यामुळे या व्हायरल परिपत्रकाने निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts