रिअल इस्टेट

प्रॉपर्टी खरेदी करा परंतु ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर होईल मोठे नुकसान

सध्या रियल इस्टेट किंवा प्रॉपर्टी मधील गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर केली जात असून गेल्या काही वर्षापासून रियल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. कारण बऱ्याचदा दिसून येते की रियल इस्टेट किंवा प्रॉपर्टी खरेदीतील गुंतवणूक कालांतराने मोठा नफा देखील मिळवून देऊ शकते.

तसेच यामध्ये गुंतवणूक देखील सुरक्षित राहत असल्याकारणाने मालमत्ता खरेदी करण्याकडे आता ट्रेंड वाढत चालला आहे. पैसा असेल तर तो एखाद्या बँकेच्या एफडीमध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवण्यापेक्षा जर रियल इस्टेट किंवा मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवला तर नक्कीच या माध्यमातून बँकांपेक्षा देखील जास्त नफा मिळवता येतो.

परंतु जेव्हा आपण प्रॉपर्टी खरेदी करतो तेव्हा मात्र आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. जेणेकरून ती प्रॉपर्टी रिसेल म्हणजेच परत विकताना आपल्याला नफा मिळेल किंवा परतावा चांगला मिळेल. नाहीतर गुंतवलेला पैसा वाया जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते व त्यानुसारच प्रॉपर्टी खरेदी करणे हे फायद्याचे आहे.

 प्रॉपर्टी खरेदी करा परंतु या गोष्टींकडे लक्ष ठेवा

1- मालमत्तेचे लोकेशन किंवा मालमत्ता कुठे आहे? हे पाहणे तुम्हाला जर एखादे घर किंवा फ्लॅट किंवा जागा खरेदी करायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्या प्रॉपर्टीचे लोकेशन पाहणे खूप गरजेचे आहे. कारण संबंधित प्रॉपर्टीचे लोकेशन म्हणजेच तिचे स्थान काय आहे? ही बाब प्रॉपर्टी रिसेल करताना किंमत वाढवण्यामध्ये खूप मोठी भूमिका पार पडते.

तुम्ही जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये चांगला परतावा मिळावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असाल किंवा मालमत्ता खरेदी करत असाल तर तुम्ही ती अशा क्षेत्रामध्ये खरेदी करणे गरजेचे आहे जिथे कायम पायाभूत सुविधा किंवा इतर आवश्यक गोष्टींची वाढ होत राहणार आहे. ही बाब तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळण्यासाठी खूप मदत करते.

2- प्रॉपर्टीच्या आजूबाजूला असलेल्या पायाभूत सुविधा मालमत्तेच्या लोकेशन नंतर तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करणार आहात त्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.

म्हणजेच प्रॉपर्टी पासून हॉस्पिटल, शाळा तसेच बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच उद्याने इत्यादींच्या आंतर पाहणे देखील गरजेचे आहे.

कारण प्रॉपर्टीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फायदा होतो. समजा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तेव्हा या सुविधा त्या ठिकाणी नसतील परंतु येणाऱ्या भविष्यकाळात त्या तिथे बांधले जातील अशी शक्यता असणे तरी गरजेचे आहे.

3- सार्वजनिक

वाहतुकीच्या सोयी तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करत असाल त्या ठिकाणहून सार्वजनिक वाहतूक किती दूर आहे किंवा किती अंतरावर उपलब्ध आहे हे देखील बघणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या एरियामध्ये प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्या एरियाशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थिची कनेक्टिव्हिटी कशी आहे? याला देखील खूप महत्त्व आहे.

जर तुम्ही ज्या लोकेशनला प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्या लोकेशनशी कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर प्रॉपर्टीची किंमत वाढण्यास मदत होते व अशा ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे प्रॉपर्टी गुंतवणूक करण्याआधी सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हिटी चांगली असेल अशा ठिकाणीच करावी.

4- व्यावसायिक केंद्रे जवळ असावेत तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्या ठिकाणापासून जवळच कार्पोरेट ऑफिस आणि कमर्शियल हब म्हणजेच व्यावसायिक केंद्र असतील तर अशा ठिकाणी घेतलेले प्रॉपर्टी विक्रीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

इतकेच नाहीतर घेतलेली प्रॉपर्टी तुम्ही भाडे तत्वावर देऊन देखील चांगला पैसा मिळवू शकता. कारण ज्या ठिकाणी व्यावसायिक केंद्र किंवा कॉर्पोरेट ऑफिस जवळ असतात त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची निवासी मालमत्ता भाडेतत्त्वावर देऊन चांगला पैसा मिळवता येऊ शकतो.

5- रेंटचा विचार करावा कधीही तुम्हाला निवासी मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज खरेदी करायची असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला भाड्याचे उत्पन्न मिळेल अशा ठिकाणीच मालमत्ता खरेदी करावी.

तुम्ही जर लोन घेऊन प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर भाड्याच्या मालमत्तेमध्ये तुम्हाला उत्पन्न मिळत राहते व तुम्ही आरामात ईएमआय देखील भरू शकतात व अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या देखील बऱ्याच प्रमाणात यामुळे कमी व्हायला मदत होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts