Mhada News:- मुंबई किंवा पुणे व इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे घर खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु यामध्ये शासनाच्या गृहनिर्माण संस्था जसं की, म्हाडा आणि सिडको सारख्या संस्थांकडून हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली जाते.आपल्याला माहित आहे की,म्हाडाच्या माध्यमातून घरांसाठी सोडत जाहीर केली जाते व या माध्यमातून अनेकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येते.
नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे व त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सध्या सुरू आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितले तर म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
म्हाडाने घरांच्या किमती केल्या कमी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विकास नियंत्रण नियमावलीच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या 370 सदनिकांची जी काही विक्री किंमत आहे त्यामध्ये सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येत असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी दिली.
मुंबई मंडळ सदनिकांची जी काही विक्री प्रक्रिया आहे त्यासाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता एकोणवीस सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यामध्ये नवीन आणि मागील सोडतील ज्या काही सदनिका होत्या त्या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झाले आहेत.
कोणत्या घरांच्या किमती करण्यात आल्या कमी?
यामध्ये आता अत्यल्प उत्पन्न गटातील ज्या काही सदनिका आहेत त्यांच्या किमतींमध्ये 25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे व त्यासोबत अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमतीत 20%, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमतीत 15 टक्के आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमतीत दहा टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचे महत्वपूर्ण माहिती देखील अतुल सावे यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी असलेल्या जनसंवाद सुलभ आणि पारदर्शक राहण्याच्या दृष्टिकोनातून म्हाडाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे अनावरण अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडाच्या मुख्यालयात करण्यात आली त्यावेळी त्यांनी ही सगळी माहिती दिली.