Cidco News:- प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब देखील समजली जाते. परंतु आपण या ठिकाणच्या असलेल्या घरांच्या किमती पाहिल्या तर या सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत.
या ठिकाणी घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने प्रत्येकालाच त्या ठिकाणी घर घेणे परवडत नाही. त्यामुळे जर आपण मुंबईसारख्या ठिकाणी म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांचा दृष्टिकोनातून पहिले तर यांच्या माध्यमातून अनेक गृह प्रकल्प साकारले जातात व लॉटरी पद्धतीतून घरांची विक्री केली जाते.
या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना घर घेणे शक्य होते. याच अनुषंगाने तुम्हाला देखील नवी मुंबई मधील काही ठिकाणी घर घ्यायची इच्छा असेल तर सिडकोच्या माध्यमातून आता 5000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून या माध्यमातून घराची विक्री करण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
सिडको करणार 5 हजार पेक्षा अधिक घरांची विक्री
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर सिडकोच्या माध्यमातून दोन टप्प्यांमध्ये 25000 घरांची योजना राबविण्यात आलेली होती. परंतु यातील तब्बल 7000 घरांची विक्री अद्याप पर्यंत झालेली नाही. यामागे अनेक प्रकारची कारणे आहेतच
परंतु अनेक ग्राहकांनी पैसे भरण्यास असमर्थता दाखवल्यामुळे देखील ही घरे त्यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने सिडकोच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी यासाठीची जाहिरात देखील काढण्यात आलेली होती. परंतु तिला देखील प्रतिसाद मिळालेला नव्हता.
त्यामुळे आता या घरांसाठी परत एकदा लॉटरी काढण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला असून यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही घरे विक्री करण्याची सिडकोची योजना आहे. तसेच नवी मुंबईमध्ये देखील गृह संकुल बांधण्यात येणार असून ठाण्यामध्ये देखील लवकरच या साठीची लॉटरी काढण्यात येणार आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे आता सिडकोच्या माध्यमातून टू बीएचके चा एक प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोने गेल्या दोन वर्षांमध्ये दोन टप्प्यात 25000 घरांची योजना राबवलेली होती व आता पुन्हा 5000 घरांची लॉटरी निघणार असल्यामुळे ज्या व्यक्तींना या ठिकाणी घरे घ्यायची इच्छा आहे असे नागरिक आता या जाहिरातीची वाट पाहत आहेत.
सिडकोची ही घरे कोणत्या ठिकाणी असणार आहेत?
सिडको आता या घरांच्या विक्रीसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करणार असून यासंबंधीचे नियोजन देखील सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी संगणकीकृत प्रणाली देखील तयार करण्यात आलेली आहे.
हे घरे प्रामुख्याने खारघर मानसरोवर, उलवे, वाशी, जुईनगर आणि कळंबोली या ठिकाणी असणार आहेत. तसेच सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत गृह संकुल बांधणार असून नावडे नोडमध्ये सिडको दोन बीएचके फ्लॅट देखील उभारणार आहे. एवढेच नाही तर मध्यमवर्गीयांकरिता स्वतंत्र टाऊनशिप नावडे या ठिकाणी विकसित होत असलेल्या नोडमध्ये उभारण्याचा प्रस्ताव सिडकोने ठेवला आहे.
यावर्षी या घरांच्या विक्रीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खाजगी बिल्डरांच्या घरांच्या किमतींपेक्षा या घरांच्या किमती स्वस्त असणार असल्याची माहिती सिडकोच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या कोणाला नवी मुंबईमध्ये घर घ्यायची इच्छा असेल त्यांची इच्छा पूर्ण होण्यास यामुळे मदत होणार आहे.