Real Estate Rule:- गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण भारतामध्ये रियल इस्टेट क्षेत्रात तेजी आली असून मोठ्या प्रमाणावर नवीन घरांची खरेदी केली जात आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मुंबई तसेच पुणे सारख्या शहरांमध्ये देखील नवीन घर खरेदी करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
आपल्याला माहित आहे की, जेव्हा आपण नवीन घर घेतो तेव्हा त्याची खरेदी करताना आपल्याला मुद्रांक शुल्क भरावे लागते व सगळ्यात जास्त खर्च मुद्रांक शुल्कावर येत असतो. परंतु महिलांच्या बाबतीत पाहिले तर महिलांना काही बाबतीत मुद्रांक शुल्कावर सूट किंवा सवलत देण्यात येते.
अगदी हीच बाब मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जर महिलांच्या नावे घर खरेदी केली तर महिलांना मुद्रांक शुल्कावर एक टक्के सवलत दिली जाते. या व इतर कारणांमुळे सध्या मुंबईमध्ये महिलांच्या नावाने घर खरेदीचा ट्रेंड वाढल्याचे दिसून येत आहे.
महिलांच्या नावे घर खरेदी करण्याचे फायदे
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महिलांनी मालमत्ता खरेदी केली तर त्यांना मुद्रांक शुल्कामध्ये शासनाकडून एक टक्क्याची सवलत दिली जाते. अगोदर महाराष्ट्र मध्ये सरकारच्या माध्यमातून सवलतीच्या घरांच्या विक्रीकरिता 15 वर्षांचा निर्बंध ठेवण्यात आलेला होता.
परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून विक्रीसाठी असलेला पंधरा वर्षांचा निर्बंध काढून टाकला असून त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांच्या नावावर फ्लॅट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईतच नव्हे तर उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये देखील हीच स्थिती आहे.
महाराष्ट्र मध्ये महिलांना मुद्रांक शुल्कावर एक टक्के सवलत दिली जाते. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करताना जे काही भाषण केले त्यामध्ये सांगितले होते की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या
ग्रामीण भागातील 70 टक्के पेक्षा जास्त घरांमध्ये महिला या स्वतंत्र असून या योजनेअंतर्गत अधिक खरेदी केलेली मालमत्ता घरातील किमान एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व अशा प्रकारचा नियम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लागू करण्यात आलेला आहे.
महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेली घरांमध्ये गुंतवणूक व आकडेवारी
2023 मध्ये साधारणपणे नऊ हजार 388 महिला खरेदीदारांनी तब्बल 9284 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती व याकरिता 485 कोटींचे मुद्रांक शुल्क भरले होते. या तुलनेत 2022 मध्ये मात्र 4901 महिलांनी मालमत्तेत गुंतवणूक केली व 4212 कोटी किमतीची मालमत्ता महिला खरेदीदारांच्या माध्यमातून विकत घेण्यात आलेली होती
व या करिता 207 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते. या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की, मुद्रांक शुल्कावरील एक टक्के सवलतीचा लाभ घेतलेल्या महिला आता पुढील वर्षाकरिता 15 वर्षासाठी सदर मालमत्ता पुरुष खरेदीदारांना विकू शकणार नाहीत हा जो काही निर्बंध महाराष्ट्र सरकारने काढून टाकला त्यामुळे या संख्येत वाढ झाल्याची स्थिती आहे.