ICICI Home Loan:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु जागांच्या वाढलेल्या किमती व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता प्रत्येकालाच घराचे स्वप्न पूर्ण करता येते असे नाही. त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये जर घर घ्यायचे असेल तर प्रचंड प्रमाणात पैसा लागतो. त्यामुळे बरेच व्यक्ती हे होम लोन म्हणजेच गृह कर्जाचा आधार घेतात.
गृह कर्ज अर्थात होम लोनचा विचार केला तर अनेक खाजगी वित्तीय संस्था आणि बँका देखील होम लोन देतात. प्रत्येक बँकेचे नियम किंवा व्याजदर हे होम लोन संबंधित वेगवेगळ्या असतात. यामध्ये जर तुम्ही आयसीआयसीआय या बँकेचा विचार केला तर तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करणाऱ्यांसाठी आयसीआयसीआय बँकेचे गृह कर्ज खूप फायद्याचे ठरू शकते. या लेखात आपण आयसीआयसीआय होम लोन संबंधित काही माहिती घेऊ.
आयसीआयसीआय होम
लोनचे प्रकार1- आयसीआयसीआय इन्स्टंट होम लोन– आयसीआयसीआय इन्स्टंट होम लोन हे ज्या ग्राहकांचे पगार खाते आयसीआयसीआय बँकेत आहे त्यांना इन्स्टंट होम लोनचा फायदा मिळतो. हे पूर्व मंजूर गृह कर्ज असून ते बँकेच्या इंटरनेट पोर्टलच्या माध्यमातून लागू केले जाऊ शकते. या प्रकारच्या योजनेत फ्लोटिंग व्याजदर हा 8.75 पासून सुरू होतो व 0.25% + कर कमी प्रक्रिया शुल्कासह असतो. साधारणपणे पगारदार कर्जदारांकरिता रेट ऑफ इंटरेस्ट पाहिला तर तो 9.00% ते 9.10% आणि स्वयंरोजगार कर्जदारांकरिता 9.00% ते 9.10% पर्यंत असतो.
आयसीआयसीआय इन्स्टंट होम लोन चे वैशिष्ट्ये
या प्रकारचे होम लोन काही क्लिकमध्ये मंजूर केले जाते. यातील कर्ज मंजुरी पत्र हे सहा महिन्यांकरिता वैध आहे व या कालावधीत तुम्ही वितरणासाठी विनंती करू शकतात. या माध्यमातून देऊ केलेली कमाल कर्जाची रक्कम रुपये एक कोटी रुपयांपर्यंत असते व कर्जाची कमाल मुदत ही 30 वर्षे असते.
आयसीआयसीआय बँक तीस वर्षाचे गृह कर्ज
यामध्ये महिला अर्जदार आणि कंपन्यांच्या निवडक गटाकरिता काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी आयसीआयसीआय बँक तीस वर्षाचे गृह कर्ज देते. त्या माध्यमातून बँक तुम्हाला तीस वर्षांपर्यंत लवचिक कर्ज कालावधी प्रदान करते. या प्रकारच्या कर्जावर 8.80% पासून पुढे व्याजदर आकारला जातो. तसेच या प्रकारात एकूण कर्ज रकमेच्या 0.50% आणि एक टक्के दरम्यान प्रक्रिया शुल्क लागते.
यामध्ये तीस लाख रुपयांच्या खाली कर्जाची रक्कम असेल तर पगारदार कर्मचाऱ्यांकरिता 9.00% व स्वयंरोजगार महिला असतील तर त्यांना 9.00% ते 9.10% इतका व्याजदर लागतो. कर्जाची रक्कम जर 35 लाख ते 75 लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर पगारदार कर्मचाऱ्यांना 9.50% ते 9.80% व स्वयरोजगार महिला असतील तर त्यांना 9.5% ते 9.20% इतका व्याजदर लागतो. कर्ज ची रक्कमदर 75 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर पगारदार कर्मचाऱ्यांना 9.60% ते 9.90% आणि स्वयंरोजगार महिला असतील तर त्यांना 9.10% ते 9.25 टक्के इतका व्याजदर लागते.
या प्रकाराकरता लागणारी कागदपत्रे
1- पगारदार कर्मचाऱ्यांसाठी–ओळखपत्र, वयाचा व पत्त्याचा पुरावा, गेल्या सहा महिन्यातील बँक स्टेटमेंट, आयकर परतावाचा फॉर्म 16, प्रक्रिया शुल्काकरिता चेक आणि मागील तीन महिन्याची पगार स्लिप
2- स्वयंरोजगार व्यावसायिक महिलांसाठी कागदपत्रे– ओळखपत्र तसेच वयाचा व पत्त्याचा पुरावा, मागिल सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट तसेच व्यवसायाच्या अस्तित्वाचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, आयकर संपूर्ण गणने सह मागील तीन वर्षाचा परतावा, ऑडिट केलेले ताळेबंद आणि नफा आणि तोटा पत्रक( चार्टर्ड अकाउंटंट द्वारे प्रमाणित ) आणि प्रक्रिया शुल्काकरिता चेक
आयसीआयसीआय बँक प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना आर्थिक दुर्बल विभाग, निम्न उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांना घर खरेदी, काम तसेच विस्तार आणि सुधारणा यावर अनुदान देते.
या योजनेची वैशिष्ट्ये
यामध्ये व्याज अनुदान तीन टक्क्यांपासून ते 6.50 टक्क्यांपर्यंत थकबाकी मूळ रकमेवर ऑफर केले जाते. तसेच वीस वर्षांपर्यंतच्या कर्जाच्या अटींवर व्याज अनुदान मिळू शकते. या माध्यमातून जास्तीत जास्त रुपये लाभार्थीच्या श्रेणीनुसार 2.67 लाख कर्ज अनुदान मिळते.
यासाठी आवश्यक पात्रता
1- लाभार्थ्याकडे भारताच्या कोणत्याही भागांमध्ये त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचे पक्के घर नसावे.
2- विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही पती-पत्नी एकत्रित मालकीमध्ये एकल अनुदानास पात्र आहेत.
3- लाभार्थी कुटुंबाने भारत सरकारकडून गृहनिर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय मदत किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतील कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा.