रिअल इस्टेट

60 लाखाचे होमलोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

Home Loan EMI : भारतात अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढती महागाई, सिमेंट, वाळू, लोखंडी सळ्या इत्यादी बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर आणि शहरीकरण तसेच औद्योगिकीकरण यामुळे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

परिणामी आता सर्वसामान्यांना घर घेणे आवाक्याबाहेर वाटू लागले आहे. यामुळे आता अनेक जण होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. जर तुम्हीही होम लोन घेऊन तुमच्या स्वप्नातील घरनिर्मितीचा प्लॅन आखत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.

आज आपण बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून 60 लाखांच्या घरासाठी होम लोन घेतले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागू शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचे लाखो खातेधारक आहेत.

ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात होम लोन पुरवत आहे. सध्या स्थितीला या बँकेच्या माध्यमातून फेस्टिवल ऑफरमध्ये 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे या बँकेकडून ग्राहकांसाठी घराच्या किमतीचे 90% पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

यामुळे कमी डाऊन पेमेंट वर बँक ऑफ बडोदा कडून होम लोन मिळत आहे. विशेष बाब अशी की या बँकेच्या माध्यमातून होम लोनसाठी कोणत्याच प्रकारचे प्रोसेसिंग चार्ज देखील घेतले जात नाही. मात्र, बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून होम लोन च्या व्याजदरात दिली जाणारी ही सवलत आता थोडेच दिवस सुरू राहणार आहे.

ही ऑफर 11 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली असून 7 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. होम लोन चे पैसे 7 जानेवारी 2024 पर्यंत खात्यात जमा झाल्यास अशा कर्जावर बॅंकांच्या माध्यमातून ही सुट मिळणार आहे.

जर या व्याजदरात एखाद्या व्यक्तीला 60 लाख रुपयांच्या घरासाठी कर्ज घ्यायचे असेल तर अशा व्यक्तीला 54 लाख रुपये एवढे होम लोन मंजूर होणार आहे. म्हणजेच सदर कर्जदार व्यक्तीला सहा लाख रुपये डाऊन पेमेंट करावे लागतील.

बँकेच्या माध्यमातून तीस वर्षांपर्यंत लोन दिले जाऊ शकते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने जर 54 लाख रुपयांचे कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी 8.40% व्याजदरात घेतले तर सदर व्यक्तीला 41,139 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

या होम लोन साठी 94 लाख दहा हजार 124 रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे. अशा तऱ्हेने हे घर एक कोटी 54 लाख दहा हजार 124 रुपयांना संबंधित व्यक्तीला मिळू शकणार आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने डाऊन पेमेंट म्हणूनच लाख रुपये दिले होते आणि

चाळीस लाख रुपयांचे कर्ज घेतले तर अशा व्यक्तीला तीस हजार 474 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts