Mumbai Real Estate News : लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत आहे. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू केला आहे.
समाजातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी शिंदे सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक योजनांचा प्रत्यक्षात लाभही मिळू लागला आहे. यामध्ये सर्वात चर्चिली जाणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.
दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक मेगा प्लॅन बनवला असल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर राजधानी मुंबईत आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी आपल्या उराशी बाळगलेले असेल. मात्र, महागाई नावाची डायन हे स्वप्न पूर्ण होऊ देत नाही.
पण, सर्वसामान्यांना मुंबई हक्काचे घर मिळावे यासाठी शिंदे सरकार आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरे तर मुंबईत जवळपास 100 हून अधिक पुनर्विकास गृहप्रकल्प रखडले आहेत.
मात्र आता हे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.यानुसार जवळपास दोन लाखाहून अधिक कुटुंबियांना मुंबईत हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.
मुंबईत साधारणतः 120 पुनर्विकास गृह प्रकल्प रखडलेले असून या प्रकल्पातील 60 प्रकल्प हे महापालिकेचे आहेत.
पण आता हे रखडलेले प्रकल्प सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, एमआयडीसी, महाप्रित आणि पालिकेतर्फे मार्गी लावण्याचा मानस सरकारचा असल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार या पुनर्विकास प्रकल्पासाठी जो खर्च येईल, म्हणजे नवीन इमारतींच्या बांधकामासाठी जो खर्च येईल तो खर्च सेलेबल इमारतीतल्या खोल्या विकून जे पैसे मिळतील त्यातून वसूल केला जाणार आहे.
घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरचा ज्या प्रमाणे पुनर्विकास झाला आहे त्याच धर्तीवर या रखडलेल्या पुर्नविकासाला चालना दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले गेले आहे.
यामुळे लाखो कुटुंबाचे घराचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होऊ शकणार आहे. नक्कीच शिंदे सरकारने असा निर्णय घेतला तर हा निर्णय गेमचेंजर ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला याचा मुंबई फायदा होऊ शकणार आहे.