Green Home: तुम्हाला माहिती आहे का ग्रीन होम कशाला म्हणतात? घर बांधायच्या आधी नक्कीच याचा विचार करा!

Green Home:- प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वतःचे घर असावे व आपल्या स्वप्नातील घर कसे असावे याचा देखील प्रत्येकाने विचार करून ठेवलेला असतो. अगदी मग त्या घराचे लोकेशन असो किंवा घर बांधल्यानंतर त्यामध्ये काढण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच फर्निचर पासून तर बाहेरील बगीचापर्यंत  सगळा विचार घर बांधण्याच्या अगोदर केला जातो.

यासोबतच घर बांधताना वास्तुशास्त्राचा देखील अनेक दृष्टिकोनातून विचार केला जातो व त्यानंतरच घराचे बांधकाम हे केले जात असते. प्रत्येक जण आपली आर्थिक क्षमता पाहून घराचे बांधकाम करत असतो व त्या दृष्टिकोनातून घर बांधले जात असते.

याच घराच्या दृष्टिकोनातून जर आपण ग्रीन होम या संकल्पनेचा विचार केला तर ही संकल्पना बऱ्याच जणांना अजून माहिती नसेल. पुढे तुम्हाला घर विकत घ्यायचे असेल किंवा घर बांधायचे असेल तर तुम्ही ग्रीन होमचा विचार करायला काहीच हरकत नाही. साधारणपणे ग्रीन होम यामध्ये तुम्हाला निसर्गातून जी काही साधन संपत्ती उपलब्ध होते तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो.

 काय आहे नेमकी ग्रीन होम संकल्पना?

 जर आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार केला तर आपल्याला हवा व सूर्यप्रकाश निसर्गाने खूप मुबलक दिलेला आहे व निसर्गाने दिलेली ही मुबलक देणगीच आपल्याला घरांसाठी वापरायचे असते व त्या घरांमध्ये अशा हवा किंवा सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रदूषण कमीत कमी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा असतो व हाच ग्रीन होम मागील मूळ उद्देश आहे.

परंतु याहीपेक्षा ग्रीन होम्स या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. म्हणजेच आपण नेहमीचे बांधकामापेक्षा यामध्ये शाश्वत टिकू शकतील अशा साधनांचा वापर करून व कमीत कमी ऊर्जेचा वापर करून बांधलेल्या घरांचा देखील यामध्ये समावेश होतो.

 ग्रीन होम्स कशासाठी?

 आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घरामध्ये किंवा आपले घर जर राहिले तरी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो व त्यासोबतच पाणी देखिल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते व याचा परिणाम आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या खिशावर देखील होत असतो.

जेव्हा उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये घरातील पंखे किंवा कुलर शिवाय एअर कंडिशनर सुरू होतो तेव्हा उन्हाळ्यामध्ये विजेचे बिल प्रचंड प्रमाणात वाढते. आपण घराचे दार खिडक्या बंद करतो व एसी सुरू करत असतो व त्यामुळे खर्चात वाढ होते. परंतु याउलट ग्रीन होममध्ये नैसर्गिक ऊर्जेचा वापर जास्त करण्याला प्राधान्य दिले जाते.

यंत्रणेमध्ये तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करून तयार झालेली वीज वापरू शकता तसेच पाण्याच्या दृष्टिकोनातून रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवली जाते व पावसाचे पाणी वाचवून त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन वापरासाठी यामध्ये केला जातो. म्हणजेच ग्रीन होम संकल्पनेमध्ये तुम्ही वीज बिलामध्ये 30% पर्यंत बचत करू शकता.

 आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहे फायद्याचे

 ग्रीन होम मध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जास्त केला गेल्यामुळे यामध्ये हवेशीर आणि उत्तम प्रकाश घरामध्ये येईल अशी योजना केलेली असते. त्यामुळे नैसर्गिक हवेचा उपयोग हवा शुद्धीकरणासाठी नैसर्गिक उपायांचा वापर व झाडांचा अधिकाधिक वापर तसेच खिडक्यांमधून प्रकाश जास्त यावा त्या पद्धतीने केलेली सोय,

सौर चिमण्या तसेच एक्झॉस्ट फॅनचा वापर आणि करण्यात आलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते व राहणीमानाचा परिणाम हा आरोग्यावर देखील चांगल्या पद्धतीने होत असतो. तसेच निसर्गाशी जवळीक असणाऱ्या म्हणजेच इको फ्रेंडली साधनांचा वापर अशा प्रकारच्या घरांमध्ये केला गेल्यामुळे आपली दररोजची जीवनशैली ही निसर्गाशी पूरक होते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर ग्रीन होममध्ये बांबू तसेच पुनर्वापर केलेले धातूचे भाग, इको फ्रेंडली फर्निचर तसेच बांबूचे फर्निचर, सजावट करताना ती फिक्या रंगाची केलेली असते व अशा मुळे आपल्या जीवनशैलीवर देखील सकारात्मक परिणाम होत असतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts