Real Estate:- पुणे या शहराचा विचार केला तर हे एक वेगाने विकसित होणारे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने देशातील आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात.
तसेच औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणि हिंजवडी सारख्या ठिकाणी आयटी हब असल्याने नोकरीच्या निमित्ताने देखील अनेक जण राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे साहजिकच पुण्यामध्ये राहण्यासाठी भाड्याचे घर बरेच जण शोधत असतात.
प्रत्येक जण भाड्याचे घर शोधत असताना त्या ठिकाणचा परिसर व सोयी सुविधा व आपल्याला परवडतील अशा दरात घरे कुठे मिळतील याची चाचपणी करत असतात. या दृष्टिकोनातून आपण पुण्यातील सर्वात परवडणारी ठिकाणे कोणती याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
पुण्यातील हे ठिकाणे आहेत स्वस्त व परवडणारी
1- धनकवडी– या ठिकाणी उत्कृष्ट असे महाविद्यालय असल्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी येतात. राष्ट्रीय महामार्ग चार जवळ असलेल्या या ठिकाणी शेअरिंगच्या आधारावर भाड्याने देण्यासाठी परवडणारे फ्लॅट उपलब्ध आहेत. हे एक विकसित शहरी क्षेत्र असून स्वारगेट बस डेपो पासून अगदी जवळ आहे.
धनकवडी हे ठिकाण प्रसिद्ध कात्रज तलाव आणि स्नेक पार्कने वेढलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण आवडते आहे. धनकवडी जवळ प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम हायस्कूल, सुदर्शन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च शैक्षणिक संस्था व वैद्यकीय सुविधांच्या दृष्टिकोनातून भारती हॉस्पिटल,
सुयोग हॉस्पिटल तसेच पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इत्यादी महत्त्वाचे हॉस्पिटल देखील आहे. या ठिकाणी तुम्हाला वन बीएचकेचा फ्लॅट पाच हजार आठशे ते पंधरा हजार रुपये प्रति महिन्या दराने मिळू शकते तर 2 बीएचके चा फ्लॅट पंधरा हजार ते वीस हजार रुपये प्रति महिना या दराने मिळू शकतो.
2- वारजे– वारजे हे पुणे शहराच्या मध्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असून मुठा नदीच्या काठी वसलेले आहे. हा पुण्यातील एक विकसित परिसर असून शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील हा एक विकसित परिसर आहे. या ठिकाणी वन बीएचके फ्लॅटचे भाडे 11000 रुपये ते 16 हजार रुपये प्रति महिना असून टू बीएचकेचे भाडे 15000 ते 20 हजार रुपये प्रति महिना इतकी आहे.
3- भोसरी– शहरी भागापासून जर शांततेत राहायचे असेल तर भोसरी हे ठिकाण उत्तम आहे. भोसरी हे पुण्याचे प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र असून या ठिकाणी टाटा मोटर्स, थरमॅक्स इत्यादीसह काही प्रसिद्ध उद्योग व्यवसाय आहेत.
तसेच प्रियदर्शनी स्कूल व मास्टर माईंड ग्लोबल स्कूल सारख्या इतर शैक्षणिक संस्था व आनंद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सारखी प्रशस्त रुग्णालयांची सुविधा देखील या परिसरात आहे. या ठिकाणी वन बीएचके फ्लॅटचे भाडे नऊ हजार रुपये ते 17 हजार रुपये प्रति महिना तर टू बीएचके फ्लॅटचे भाडे 17 हजार ते 25 हजार रुपये प्रति महिना इतकी आहे.
4- वाघोली– वाघोली हे एक विकसित होणारे क्षेत्र असून या ठिकाणी अनेक नवनवीन निवासी प्रकल्प उभारली जात आहे. या ठिकाणी असणाऱ्या प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या किमतीत आरामदायी अनुभव मिळेल असे स्विमिंग पूल आणि लँडस्केप गार्डनसह इतर सुविधा देण्यात येत आहेत.
दळणवळणाच्या बाबतीत देखील वाघोली हा परिसर उत्तम असून पुणे ते अहमदनगर महामार्गाशी हा परिसर जोडलेला आहे. या ठिकाणी ज्या काही भाड्याने मालमत्ता उपलब्ध आहेत त्यापैकी 27% अपारमेंट असून अपार्टमेंटच्या भाड्याची किंमत दहा हजार ते 15000 च्या दरम्यान असून निवासी घरे 15 हजार रुपये ते 20 हजार रुपये प्रति महिना दराने उपलब्ध आहेत.
5- कात्रज– पगारदार व्यक्ती व तरुण विद्यार्थ्यांकरिता राहण्यासाठी हे एक चांगले ठिकाण असून राष्ट्रीय महामार्ग 4 च्याजवळ ते वसलेले आहे. कात्रजमध्ये देखील परवडणाऱ्या किमतीत निवासी सदनिका उपलब्ध आहेत. या ठिकाणाहून स्वारगेट बसस्टॉप अगदी जवळ असून सार्वजनिक बसेस करता मध्यवर्ती ठिकाण आहे.
उत्तम अशा शैक्षणिक संस्था व रुग्णालय तसेच कदम प्लाझा सारखा मॉल्स देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी वन बीएचके चे भाडे 7200 ते 8400 रुपये प्रति महिना तर टू बीएचकेचे भाडे आठ हजार ते 15 हजार रुपये प्रति महिना इतके आहे.
6- हिंजवडी– हिंजवडी हे पुण्याचे आयटीआय हब असून व्यवसायिकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी तरुण व्यवसायिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असून जे शेअरिंगच्या आधारावर राहायला प्राधान्य देतात. तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता कीफायतशीर दरामध्ये अनेक पीजी आणि सह राहण्याची जागा देखील उपलब्ध आहे.
तसेच अनेक नामवंत शैक्षणिक संस्था व रुग्णालय देखील या ठिकाणी असून ग्रँड हायस्ट्रिट मॉल आणि फाउंटन मार्केट सारखे मॉल्स या ठिकाणी आहेत. या ठिकाणी वन बीएचकेचे भाडे आठ हजार ते 14 हजार रुपये प्रति महिना तर टू बीएचके चे भाडे 15000 ते 22 हजार रुपये प्रति महिना इतकी आहे.